पुरवठा विभाग एसीबी ट्रॅप प्रकरण : रेशन दुकान नावावर करण्यासाठी मागितली होती लाच

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथील एका व्यक्तीकडून आजोबांचे रेशन दुकान त्यांच्या वडीलांच्या नावावर करण्याच्या मोबदल्यात लाच हजाराची लाच मागितल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणी दोन महिला कर्मचारींसह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

येथील जिल्हा पुरवठा शाखेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचून जिल्हा पुरवठा विभागातील चार जणांना रंगेहात अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती. तक्रारदार यांच्या आजोबांचे रेशन दुकान असुन सदर दुकान त्यांच्या वडीलांच्या नावावर करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे प्रमिला भानुदास नारखेडे (वय-५७, व्यवसाय नोकरी, अव्वल कारकुन, पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव. रा. मेथाजी प्लॉट, वसंत टॉकीजमागे,भुसावळ), पुनम अशोक खैरनार (वय-३७ व्यवसाय-नोकरी अव्वल कारकुन, पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव) प्रकाश त्र्यंबक पाटील ( वय-५५, व्यवसाय- हमाल कंत्राटदार,रा-जाकीर हुसेन कॉलनी, संभाजी नगर, जळगाव.ता.जि.जळगाव) यांनी यांनी पंचासमक्ष 40,000 रूपयाची मागणी केली होती. सदर लाचेची रक्कम आज योगेश नंदलाल जाधव ( वय-३३ व्यवसाय- दुध डेअरी, रा. गुजराल पेट्रोल पंप, जैन मंदीराजवळ) याने स्वीकारली. सदर कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा जळगाव येथे करण्यात आली. दरम्यान, एसीबीची धाड पडल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी हे देखील या प्रकरणात अडकल्याची चर्चा होती. परंतू नंतर ही अफवा असल्याचे उघड झाले.

 

याबाबत वृत्त असे की, जिल्हा पुरवठा शाखेत मोठ्या प्रमाणात लाचखोरी होत असल्याची तक्रार कधीपासूनच होती. या पार्श्‍वभूमिवर, आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास एसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत जिल्हा पुरवठा विभागातील एकूण चार जणांना रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यात एक महिला कर्मचारी आणि दोन पंटर्सचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Protected Content