पिपल्स बँकेबद्दल अफवांना बळी पडू नका – चेअरमन भालचंद्र पाटील (व्हिडीओ)

bhalchanra patil people bank

जळगाव प्रतिनिधी । भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सन मार्च २०१७-१८च्या तपासणी अहवालाच्या आधारे दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक यांना अनुत्पादीत कर्जासंबंधी निर्देशांचे पालन न केल्याबद्दल २५ लाखांचा दंड केला आहे. हा दंड तांत्रिक कारणांमुळे असून त्याचा बँकेच्या इतर व्यवहारांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ग्राहकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता तसेच कुठलीही शंका मनात न ठेवता निश्चिंतपण बँकेशी असलेला व्यवहार आणि आपुलकीचे संबंध कायम ठेवावे असे आवाहन चेअरमन भालचंद्र पाटील यांनी केले आहे.

जळगाव पीपल्स बँकेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम आहे. बँकेने अनुत्पादीत कर्जासाठी केलेली तरतूद आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. ३१ मार्च २०१९ अखेर बँकेचे स्वभांडवल रु.१९७.२६ कोटी असून बँकेच्या आर्थिक भक्कमतेचा निर्देशक भांडवल पर्याप्तता ११.६६% आहे. आरबीआय निकषांनुसार ती ९% अपेक्षित असते. बँकेचा सी.डी. रेशो ६२.३५% आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकेचा ऑपरेटींग प्रॉफीट रु. १९.१२ कोटी असून या वर्षाअखेर ऑपरेटींग प्रॉफीट रु.३६ कोटींपेक्षा अधिक होण्याचा विश्वास आहे. आरबीआय च्या निकषांचे पालन करण्यासाठी बँक वचनबद्ध आहे. बँकेची वाटचाल प्रगतीपथावर असून बँकेच्या पुढील योजना अंमलात आणण्यासाठी बँकेने १४ ऑक्टोबर २०१९ रोजी आपली प्रणाली Infosys ह्या कंपनीच्या जगविख्यात Finacle (Latest Version 10.2.18) सॉफ्टवेअर कार्यान्वित केली आहे. सभासद, ठेवीदार, ग्राहक, खातेदार यांच्या बँकेवरील खंबीर पाठींब्यावर बँक ८६ वर्षांपासून कार्य करीत आहे. बँकेचे संचालक मंडळ व व्यवस्थापन सदैव जनसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. बँकेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे विश्वासाचे अतूट नाते भविष्यातही निभावत बँक प्रगतीपथावर राहील अशी मी ग्वाही देतो. असेही त्यांनी कळविले आहे.

Protected Content