शिवाजीनगर परिसरात जनता कर्फ़्युला उत्स्फूर्त प्रतिसाद (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । जळगावात प्रभागनिहाय आज सोमवारपासून प्रभागनिहाय स्वयंघोषित जनता कर्फ्यूचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले होते.  यास शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

सोमवार, २० जुलै रोजी प्रभाग १, २, ३ – शिवाजीनगर, राधाकृष्ण नगर, महावीर नगर, इंद्रप्रस्थ नगर, गेंदालाल मिल, वाल्मीकनगर असोदा रोड, कांचननगर, सदाशिव नगर आदी परिसरात जनता कर्फ़्युचे आवाहन करण्यात आले होते. या, परिसरातील नागरिकांनी जनता कर्फ़्युला प्रतिसाद देऊन अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शिवाजी नगरच्या मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त होता. शहरात पोलिसांनी टॉवर चौकात बंदोबस्त व बॅरेकेट उभारून एकेरी वाहतूक सुरु ठेवली होती. प्रभागनिहाय जनता कर्फ्यू असल्याने शहरात नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/280100876388930/

Protected Content