महेश नवमीनिमित्ताने शहरात विविध सामाजिक उपक्रम संपन्न (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अखिल भारतीय माहेश्वरी महासभेच्या वतीने महेश नवमी अर्थात महेश्वरी समाजाच्या वंश उत्पत्ती दिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

 

महेश नवमी निमित्ताने पहाटे ६.३० वाजता ‘बालाजी मंदिर संस्थान’ येथे अभिषेक आणि आरती करण्यात आली. त्यानंतर पांजरापोळ गोशाळेत आ.भा.माहेश्वरी सभेच्या संघटन मंत्री शैलाजी कलंत्री यांच्या हस्ते गो-सेवा पार पडली. अयोध्या नगर येथील महादेव मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय गायकवाड यांच्या उपस्थितीत स्व. मोतीभाऊ दहाड परिवारातर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळ वाटप करण्यात आले.

माहेश्वरी बोर्डिंग येथे आयोजित रक्तदान शिबीराचं उद्घाटन माजी नगरसेवक श्यामभाऊ कोगटा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सायंकाळी माहेश्वरी बोर्डिंग येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली, या शोभायात्रेत ४ ते ५ सुंदर सजावटीसह देखावे सामिल झाले होते. जळगावातील सर्वांना ‘सेवा, त्याग आणि सदाचार’ या मूल्यांवर आधारित देखावे दाखविलेत. शोभायात्रेची सांगता माहेश्वरी बोर्डिंग येथे करण्यात येते.

सायंकाळी माहेश्वरी बोर्डिंग येथे श्री जळगाव विवाह सहयोग समितीतर्फे २९ वा उच्च शिक्षीत परिचय सम्मेलनाच्या वेबसाईटचे उद्घाटन जिल्हा सभेचे अध्यक्ष अॅड. नारायण लाठी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दिपक लढ्ढा, विजय झंवर सर, डॉ.जगदीश लढ्ढा, वासूदेव बेहेडे, सुभाष जाखेटे यांची उपस्थिती होती. महेश चौकाच्या सुशोभीकरणासाठी ‘महेश मार्ग’ प्रभागाच्या सगळ्यांनीच सहकार्य केले. याप्रसंगी माजी महापौर नितीनभाऊ लढ्ढा, माजी नगरसेवक राधेश्याम कोगटा, ॲड. नारायण लाठी, माणकचंद झंवर, प्रा.संजय दहाड, मनीष झंवर, केदारनाथ मुंदडा, योगेश कलंत्री, विलास काबरा, राधाजी झंवर, चंचल तापडिया, अरुणा मंत्री, उर्मिल झंवर, दिपक लढ्ढा, ॲड.प्रविण झंवर, ॲड.सुरेंद्र काबरा, ॲड.विजय काबरा, जितेंद्र मंडोरा, शिवनारायण तोष्णीवाल, राकेश लढ्ढा, संजय चितलांगे, सत्यनारायण मंडोरा, प्रमोद हेडा, तेजस देपूरा उपस्थित होते असे बी.जे.लाठी सर कळवितात.
यशस्वितेसाठी ‘जळगाव शहर युवा संघटनेतर्फे’ कामकाज पहिले. यासाठी मधुर झंवर, अक्षय बिर्ला, संतोष समदाणी, हर्षल तापडिया, राहुल लढ्ढा, अनिमेश मुंदडा, प्रवीण सोनी, उल्केश कलंत्री, कार्तिक झंवर, राज तापडिया, अभिषेक झंवर, कपिल लढ्ढा, अक्षय लढ्ढा, पियुष दहाड, सचिन लाहोटी, कल्पेश काबरा, संकेत जाखेटे, धीरज नवाल, ऋषिकेश झंवर, निल बाहेती, यश लढ्ढा, विष्णु मुंदड़ा आणि सगळ्या युवा सदस्यांनी अत्यंत परिश्रमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/726395575362081

 

Protected Content