Home क्राईम लोखंडी सुरा घेवून फिरणाऱ्या तरूणाला अटक

लोखंडी सुरा घेवून फिरणाऱ्या तरूणाला अटक

0
38


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनी लोखंडी सुरा घेवून फिरणाऱ्या तरूणाला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान मंदीराजवळ तरूण हातात मोठा लोखंडी सुरा घेवून फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार बुधवार ८ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पोलीसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपी राकेश कैलास सपकाळे (वय-१९) रा. मोठा हनुमान मंदीर, रामेश्वर कॉलनी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १६ इंच लांबीचा लोखंडी सुरा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राकेश सपकाळे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यांनी केली कारवाई

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, सचिन पाटील, योगेश बारी, पो.कॉ. गोविंदा पाटील यांनी कारवाई केली.


Protected Content

Play sound