चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे आकाशकंदील बनविण्याचे प्रशिक्षण शिबिर

chandorkar shibir news

जळगाव, प्रतिनिधी । शहरात स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे गेल्या आठवड्यात आयोजित आकाशकंदील बनविण्याचे प्रशिक्षण शिबिरात जयादित्य बाकरे व कल्पना भावसार यांनी बाजी मारली. प्रशिक्षणाचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले. त्यासाठी मल्हार कम्युनिकेशनचे सहकार्य लाभले.

स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानतर्फे आयोजित या शिबिराचे नाव कलेतून निर्मितीकडे असे ठेवण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात सुमारे 60 विद्यार्थी व हौशी पालकांनी भाग घेतला होता. मल्हार कम्युनिकेशनचे सर्वेसर्वा आनंद मल्हारा यांनी उद्घाटन समारंभाप्रसंगी, शिबिरात शिकवल्या गेलेल्या कंदीलांमध्ये जो कलाकार आपली उत्तम कलात्मकता दाखवेल अशा कलावंतांना मल्हार कम्युनिकेशनकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. शिबिरात सर्वोत्कृष्ट कंदील बनवणारा स्पर्धक जयादित्य बाकरे व कल्पना भावसार या दोघांची निवड करण्यात आली. तसेच चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे यज्ञेश जोशी व अनुश्री सोमाणी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रतिष्ठानचे सचिव अरविंद देशपांडे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास वरुण देशपांडे, अमित महाजन, जुइली कलभांडे, सरिता महाजन, मयुर पाटील, स्वानंद देशमुख, निनाद चांदोरकर, माधव पोतनीस, अनघा देशपांडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Protected Content