गरुड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलनात यश

शेंदूर्णी, जामनेर, प्रतिनिधी | येथील गरुड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित जिल्हास्तरीय “प्रतिभा संगम- २०२२” साहित्य संमेलनात घवघवीत यश संपादन केले आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

जामनेर येथील सेकं.एज्यु. को-ऑप सोसायटी संचलित अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय “प्रतिभा संगम-2022” साहित्य संमेलनात घवघवीत यश संपादन केले आहे. द.द.ना.भोळे महाविद्यालय भुसावळ व राष्ट्रीय कला मंच जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. सदरील स्पर्धेत गरुड महाविद्यालयाच्या संघाने पथनाट्य सादरीकरण, कविता सादरीकरण व ललित गद्य वाचन या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले. गरुड महाविद्यालयाच्या संघाने पथनाट्य सादरीकरण स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला, तसेच महाविद्यालयातील स्वनिल जाधव या विद्यार्थ्याने मराठी काव्यवाचन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला, गायत्री चौधरी या विद्यार्थिनीने हिंदी काव्यवाचन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला, राहुल सुलताने या विद्यार्थ्याने ललित गद्य वाचनात तिसरा क्रमांक पटकावला. विजेत्या संघास व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयाच्या संघात महेंद्र घोंगडे, स्वप्नील जाधव, प्रतिक बोरसे, प्रथमेश जाधव, निलेश बारी, महेंद्र चव्हाण, संजय सुलताने, गायत्री चौधरी, वंचिता गुजर, योगिनी गुजर, ऐश्वर्या गुजर यांनी सहभाग घेतला. या ठिकाणी निवड झालेल्या संघाची व स्पर्धकांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
महाविद्यालयाने यश संपादन केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयजी गरुड, संस्थेचे सचिव दाजीसाहेब सतीश चंद्र काशीद, सहसचिव भाऊसाहेब सो.दिपकजी गरुड, संस्थेच्या महिला संचालिका उज्ज्वला काशीद, कैलासजी देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून अश्याच पध्दतीने मेहनत करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचावण्याचा आशावाद व्यक्त केला. या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमूख व उपप्राचार्य प्रा.डॉ.संजय भोळे व रासेयो कार्यक्रम अधिकारी, आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी यशस्वीपणे काम पाहिले. तसेच प्राचार्य डॉ.वासुदेव आर. पाटील यांनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले.

Protected Content