एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलू नये : परीक्षार्थ्यांची मागणी

 

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी ।एम.पी.एस.सी.ची परीक्षा पुढे न ढकलता नियोजित वेळेनुसारच घेण्यात अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना परीक्षार्थ्यांनी दिले आहे.   

मार्च १४ रोजी नियोजित एमपीएससीची परीक्षा सरकारने २१ तारखेला घेण्याचा निर्णय जाहिर केला. हा निर्णय म्हणजे  सरकारने युवकांची थट्टा केली असे समजावे का ? या पुढे शासनाने युवकांना ग्राह्य धरू नये असा इशारा देण्यात आला  आहे. रविवार १४ मार्चला घेण्यात येणारी परीक्षा कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही परीक्षा पुढे ढकलू  नये कारण या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी खूपच मेहनत घेतलेली असते. अभ्यास करण्यासाठी दिवस रात्र एक केलेली असते. पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर खूप आर्थिक खर्च केलेला असतो आणि त्यात परीक्षा रद्द झाल्याचं परिणाम विद्यार्थ्यांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक  परिस्थिती खालावली जाऊन खूप मोठया प्रमाणावर नुकसान होईल. त्यामुळं विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येईल. परीक्षा ठरलेल्या वेळेवरच घेण्यात यावं यासाठी मुक्ताईनगर तहसील व पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले.  त्याप्रसंगी ऍड. राहुल पाटील, पत्रकार अतिक खान, सतीश गायकवाड आदी उपस्थित होते.  

 

Protected Content