पुन्हा जनतेमधून थेट लोकनियुक्त सरपंच निवडण्याची मागणी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्राम पंचायत सरपंच हा थेट जनतेच्या मताने निवडून यावा. या मागणीच्या निर्णयाची पुन्हा अंमलबजावणी करावी. यासाठी सरपंच परिषद महाराष्ट्रच्या वतीने राज्यभर निवेदनाचा पाऊस होत असून याच पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने देखील निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले.

मागील भाजप सरकारच्या काळात जनतेमधून थेट सरपंच निवडून येण्याच्या शासन निर्णय लागू करण्यात आला होता त्या निर्णयाचे महाराष्ट्राच्या जनतेने स्वागत केले होते.कारण ग्राम पंचायतीच्या सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत होता परिणामी गावाच्या विकासाला चालना मिळत नव्हती.पण भाजप सरकार जाताच  महाविकास आघाडीने थेट जनतेमधून सरपंच निवडीच्या शासन निर्णय बदलून टाकला होता.त्यामुळे जनता ह्या निर्णयावर नाराज झाली होती.पण पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता जातात सरपंच परिषद मुंबई यांनी त्याच निर्णयाची पुन्हा अंमलबजावणी व्हावी यासाठी नव्याने सत्ता स्थापन केलेल्या भाजप सरकारला जनतेमधून थेट सरपंच निवडून येण्याच्या निर्णय पुन्हा लागू करावा ही मागणी केली आणि तसे निवेदन देखील राज्यभरात दिले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देखील अमळनेर सरपंच परिषदेच्या वतीने निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महिला तालुकाध्यक्षा शितल पाटील, समन्वयक सतिश पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,सरचिटणीस जिजाबराव पाटील,तालूका उपाध्यक्ष महेंद्र पाटील,ग्रा.पं. सदस्य दिलीप बोरसे,उमेश पाटील,किरण पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content