पाचोऱ्यात अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात आज २७ जुन रोजी दुपारी २ वाजता पाचोरा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल अग्निपथ योजना जाहिर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या भाजपा प्रणित मोदी सरकारने हा कठोर निर्णय घेतला असून भारतीय पोलिस सेवा पोलिसांच्या ठेकेदारी पद्धतीचा अवलंब हा सैन्यामध्ये वापरण्याचा या मागील उद्देश आहे. या सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या निषेधार्थ पाचोरा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

तसेच यासंदर्भातील निवेदन तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. याप्रसंगी पाचोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शेख इस्माईल शेख फकिरा, इरफान इक्बाल मणियार, संगिता नेवे, शरिफ सादिक शेख, इस्माईल तांबोळी, प्रभाकर अहिरे, अल्ताफ मेहबूब पठाण, अमजद खान, इरफान पठाण, रवि सुरवाडे, शिवदास महाजन, सदु जाधव सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content