पाचोऱ्यात साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । घरात सर्व झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार भडगाव रोडवरील राजराजेश्वरी कॉलनीत घडला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते.

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील शक्तीधाम जवळ राहत असलेल्या व रेल्वे उड्डाणपूला जवळील महाराजा स्टाईलचे संचालक पंकज प्रमोद पाटील यांचे निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी पाचशे रुपये रोख रकमेसह साडेचार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले यावेळी पंकज पाटील हे व त्याची पत्नी हॉलमध्ये तर त्यांचे लहान बंधू वरच्या मजल्यावर झोपलेले होते पंकज पाटील यांचे घराच्या मागच्या बाजूला जंगल असून त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूने येवून दरवाजाची कडी आतून लावलेली असल्याने त्या दरवाजास हाताचे बोट जाईल ऐवढे होल पाडून बोटाने कडी सरकवली व त्याच रुममध्ये असलेले कपाट फोडून कपाटातील कपडे अस्तव्यस्त करून लॉकर मधे असलेले साडेचार तोळे सोने व एका पर्स मध्ये असलेले ५०० रुपये काढुन पर्स त्याच ठिकाणी तर सोन्याच्या रिकाम्या डब्या घरापासून सुमारे २५ फुट अंतरावर असलेल्या जागी रिकाम्या डब्या फेकुन पळ काढला. रात्री दिड वाजेच्या दरम्यान त्यांच्या बहिणीच्या मुलीला पाण्याची तहाण लागल्याने बहिण ही पाणी घेण्यासाठी गेली असता तिला दरवाजा उघडा दिसला व घरात चिखलाने माखलेल्या बुटाच्या खुना आढल्याने सदरची चोरीची घटना उघडकीस आली.

डॉग स्कॉडला पाचारण 

पाचोरा येथे पंकज प्रमोद पाटील यांच्या निवासस्थानी साडेचार तोळे सोन्याची चोरी झाल्याने जळगांव येथील डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. यात पोलिस नाईक निळकंठ व प्रकाश कणखरे यांचे सोबत जंजीर नावाचा डॉग आणण्यात आला होता. डॉग हा कपाटापर्यंत गेल्यानंतर घराच्या मागील बाजूस १ कि. मी. पर्यंत मार्ग क्रमीत केला. मात्र यातुन काय निष्पन्न झाले ? याबाबत माहिती मिळाली नाही.

अज्ञात चोरट्यांचे रक्त पडलेले आढळले

अज्ञात चोरट्यांनी पंकज पाटील यांचे घरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्यानंतर काही अंतरावर दागिन्यांच्या रिकाम्या डब्या फेकुन दिल्या व शेजारीच असलेल्या नविन बांधकाम सुरू असलेल्या घरात जावुन काहीवेळ घालविलेला अंदाज व्यक्त करुन त्यांनी चोरी केल्यानंतर झालेल्या धावपळीत चोरट्यांच्या शरिरावर जखमा झाल्याने रक्त पडलेले आढळून आले. घटनास्थळी पी. एस. आय. योगेश गनगे, सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, प़लिस हवालदार बाबासाहेब पगारे यांनी पाहणी केली.

 

Protected Content