यावल शहरासह तालुक्यात दोन दिवसीय संचारबंदीला उत्तम प्रतिसाद

 

यावल,  प्रतिनिधी ।  शासनातर्फे  संपूर्ण राज्यात शनिवार आणि  रविवार या दोन दिवसांसाठी कडक निर्बंध लागू  करण्यात आले आहे.  या संचारबंदीला यावल शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांसह  व्यापारी यांनी आपले संपुर्ण व्यवसाय बंद ठेवुन कडकडीत बंद पाळत पाठींबा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात देखील कोरोना विषाणु संसर्गा हा दुसऱ्या टप्यात अत्यंत वेगाने वाढत असून , सर्वत्र बाधीत रुग्णांची संख्या कमी होण्या एवजी सातत्याने वाढता दिसत आहे.  ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याने नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्याशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार व रविवार या दिवसाकरीता अत्यावश्यक  सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय पुर्णपणे बंद ठेवण्याचे निर्णय घेत आहे.  या दोन दिवसांच्या कडक निर्बंधला यावल शहरासह तालुक्यात सर्व नागरीकांनी व व्यापारी मंडळीनी आपले व्यवसाय पुर्णपणे बंद केल्याने या दोन दिवसीय संचारबंदीच्या पहिल्या दिवशी  चांगला प्रतिसाद मिळाला आहे . यासाठी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक अजमल खान सर्व पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी तसेच नगर परिषदचे शिवानंद कानडे , स्वप्नील म्हस्के , विजय बडे , राजेंद्र गायकवाड हे संचारबंदीच्या परिस्थिवर नजर ठेवुन आहे.

 

Protected Content