दहिगाव येथे कोरोना तपासणी शिबीर

यावल प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 चा वाढता संसर्ग लक्षात घेता सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दहिगाव येथे कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावल तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम अंतर्गत विविध गावात शिबिराचे आयोजन डॉ . हेमन्त ब-हाटे, सावखेडा सिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, डॉ. नसीमा तडवी, व डॉ. प्रवीण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

आज दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल यांच्या उपस्थितीत नागरिकांची कोरोना चाचणी (रॅपिड अँटीजन टेस्ट) समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालीद शेख व राजेंद्र बारी यांनी केली. यात गावातील तलाठी, अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा २२ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात २ व्यक्तींचा अहवाल हा पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

नागरिकांनी कोरोनाचे लक्षणे दिसताच त्वरित आपली चाचणी करून घ्यावी. नियमित मास्क चा वापर करावा. वारंवार सॅनिटायझर चा वापर करावा किंवा साबणाने हात स्वच्छ धुवावे व फीजीकल डिस्टनसिंगचे पालन करावे. असे आवाहन डॉ. नसीमा तडवी यांनी केलेले आहे.

शिबीर यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत ,अनिता नेहते व आशा सेविका आणी ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

 

 

Protected Content