पाचोरा येथील गो. से. हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प सादरीकरण

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुका शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या पेपर मार्बलिंग अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पासाठी इयत्ता ६ वी वर्गासाठी सोशल डिस्टंसिंग ठेवून विद्यार्थ्यांसमोर हा प्रकल्प सादर करण्यात केला.

शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प सादरीकरण प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, शाळेचे पर्यवेक्षक एन. आर. पाटील तसेच प्रकल्प मार्गदर्शनक म्हणून वैशाली कुमावत, इंग्रजी इंग्रजी विषय शिक्षक प्रीतम पाटील, अरुण कुमावत, चित्रकला शिक्षक सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, रवींद्र बोरसे, ज्योती पाटील, शीतल महाजन, नीता पाटील आदी शिक्षकांनाचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य व उत्साह पाहण्यात मिळाला. बऱ्याच दिवसापासून शाळा बंद असल्याने असे प्रयोग पाहून विद्यार्थी भारावून गेले होते.

Protected Content