ब्राम्हण शेवगे येथे ॲस्कॅड योजने अंतर्गत चर्चासत्र व किसान क्रेडिट कार्ड मार्गदर्शन शिबीर

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ब्राम्हण शेवगे येथे माहिती शिक्षण व जनसंपर्क अभियानांतर्गत पशुधन विभाग, पंचायत समिती चाळीसगाव व  ग्रामपंचायत ब्राम्हण शेवगे तसेच मातोश्री दुध सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ॲस्कॅड योजने अंतर्गत चर्चासत्र व किसान क्रेडिट कार्ड मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जळगाव दूध फेडरेशनचे संचालक प्रमोद पाटील पंचायत समिती चाळीसगावचे सभापती अजय पाटील, उपसभापती भाऊसाहेब पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी माळी तसेच चाळीसगाव चीलिंग सेंटरचे संजय मोरे, विशाल चव्हाण, पशुधन विकास अधिकारी डॉ.मीरा रावळकर, पशुधन विकास अधिकारी डॉ.संदिप भट शिरजगाव, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.डी.पी.कोतर, पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जळगाव दुध फेडरेशनचे संचालक प्रमोद बाप्पू पाटील यांनी दुग्ध व्यवसाय संदर्भात फेडरेशनच्या विविध योजनाबाबत  मार्गदर्शन केले. किसान क्रेडिट कार्ड संदर्भात सखोल माहिती डॉक्टर डी.पी. कोतकर यांनी विशद केली. त्याचबरोबर डॉक्टर संदीप भट यांनी या कार्यक्रमाचे व उपक्रमाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. गाव विकासाबाबत तसेच विविध समस्यांबाबत रत्नाकर पाटील यांनी गावाचे गार्हाणे मांडले. पंचायत समिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी गाव विकासाला पाहिजे ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी तर सूत्रसंचालन डॉ. डी.पी. कोतकर यांनी केले आभार हेमंत बाविस्कर यांनी मानले.

या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच मुक्ताबाई दत्तात्रय पवार, माजी सरपंच दत्तात्रय पवार, माझी पंचायत समिती सदस्य विश्वभर पवार, ग्रामपंचायत उपसरपंच शांताराम नेरकर, भाजपा तालुका सरचिटणीस रत्नाकर पाटील, प्रकाश जाधव, पोलीस पाटील राजेंद्र माळी, तंटामुक्ती अध्यक्ष मदन राठोड, संतोष बाविस्कर, समाधान पवार, सचिन पवार, कैलास शिर्के, अनिल नेरकर, बद्रीनाथ राठोड, बाळासाहेब नेरकर, ग्रामसेवक शैलेश पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातोश्री दुध सोसायटीचे प्रकाश जाधव, सचिन पवार, समाधान पवार, पकंज देसले, प्रकाश नेरकर, जिभाऊ नेरकर, भैयासाहेब बाविस्कर, नाना पाटील प्रमोद देसले, सुभाष बाविस्कर, राजेद्र बाविस्कर, समाधान मोरे यांचे सहकार्य लाभले.

Protected Content