चाळीसगाव येथे कृउब समितीत अस्वस्थ शेतकऱ्यावर तातडीने उपचार

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर विक्री करणारे शेतकरी कुलकर्णी यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते जमिनीवर कोसळले. कुलकर्णी यांच्यावर तात्काळ बाजार समिती आवारात उपचार करण्यात आल्याने त्यांना वाचविण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाजार समिती प्रशासकीय मंडळाने भव्य असे उपचार केंद्र ” आरोग्य धाम” केंद्राची निर्मिती केली व आ.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवशी राजीव देशमुख यांच्या हस्ते लसीकरण केंद्राची सुरुवात केली. कायम स्वरुपी वैद्यकीय उपचार देखील त्या ठिकाणी सुरू केले आहे. ज्यात शेतकरी बांधवांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकमेव असे केंद्र ठरणार असून कोरोनावर उपचार तसेच लसीकरण केंद्र मान्यता त्यास मिळालेल्या आहेत. बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांना मोफत उपचार मिळावे, शासनाच्या विविध योजनांचा उपचारा दरम्यान लाभ व्हावा, या शुद्ध हेतूने वामनराव देशमुख फाऊंडेशन व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे .लवकरच सहकार मंत्री व पणन मंत्री यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून आज एका शेतकरी बंधुस त्याचा उपयोग झाल्याने आमचा उद्देश सफल झाल्याचे मार्गदर्शक प्रदीप देशमुख व मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी त्या प्रसंगी सांगितले. प्रभारी सचिव सतिष पाटील व कर्मचारी वीरेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले आहे

 

Protected Content