आदर्श शिक्षकाची संवेदनशीलता ; गरीब कुटुंबाला दिवाळीसाठी मदत !

 

पारोळा, प्रतिनिधी । येथील राज्य पुरस्कार प्राप्त निवृत्त आदर्श शिक्षक सदानंद  भावसार यांनी आपल्या बरोबर निदान एका गरीब कुटुंबाची देखील दिवाळी साजरी व्हावी या उदात्त हेतूने आपल्या दिवाळी घरखर्चाला कात्री लावून एकनाथ काशिनाथ वाणी यांना कपडे-लत्ते व फराळ साहित्य आणण्यासाठी आर्थिक मदत करुन पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध करून संवेदनशीलतेचा प्रत्यय आणून दिला.

येथील एकनाथ वाणी हे ८० वर्षाचे वृद्ध असून शाळेजवळ गोळ्या, बिस्किटे व शालेय साहित्याची गाडी लावून मुलाच्या तुटपुंज्या कमाईत हातभार लावत होते . पण कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अल्प- स्वल्प उत्पनही गेले. सात महिन्यात घरभाडे थकले कर्ज उधार उसनवारी झाली. कुटुंब हतबल झाले अशी परिस्थिती पाहून मागील महिन्यातही उधार उसनवारी फेडण्यासाठी रुपये एक हजाराची मदत केली होती. भूक लागली असता जेवण करणे ही प्रकृती आहे, भूक नसतांना खाणे ही विकृती आहे आणि जेवत ‌असतांना आपल्या ताटातील अन्न गरीब गरजू व भुकेलेल्यास देणे हीच तर भारतीय संस्कृती आहे. आणि हेच तत्त्व आचरणात आणून भावसार सरांनी दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे.

Protected Content