आईच्या निधनानंतर भरविले भव्य महाआरोग्य शिबीर

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । प्रत्येकाला आईचं निधन झाल्याचं दुःख असतंच.  त्या दु:खातून सावरण्यासाठी मुलाने नुकतेच भुसावळ तालुक्यातील ओझरखेडे गावात समाजातील दुर्लक्षित वृद्धांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

या महाआरोग्य शिबिरात सर्व प्रकारच्या रोगांची तपासणी व निदान करण्यात आलं. ज्यांना चष्म्यांची आवश्यकता आहे, त्यांना  चष्म्यांचे  वितरण करण्यात येणार आहे. ज्यांच्यावर उपचार करण्याची आवश्यकता आहे त्यांना पुढील ट्रीटमेंट साठी देखील सहाय्य केलं जाणार आहे.

नाहाटा महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे यांच्या कमलाबाई शिवराम सुरवाडे मातोश्रींचे नुकतेच हृदयविकाराने निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचं सर्वतोपरी सहकार्य लाभले.

या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात, गावातील महिलांना आणि वृक्ष प्रेमींना सिताफळाच्या रोपांचे वाटप करण्यात आलं. श्रद्धांजली च्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, माजी आमदार चंद्रकांत पाटील सहसंपर्कप्रमुख, माजी आमदार कैलास बापु पाटील, माजी आमदार दिलीप भोळे, आमदार सुरेश मामा भोळे, आमदार संजय सावकारे, ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन भाऊ फालक, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे, यांचे शोकसंदेश प्राप्त झाले.

शिबिराचा ओझरखेडा, बोहर्डी,तळवेल ,पिंपळगाव परिसरातील नागरिकांनी भोजपूर ते प्रतिसाद देऊन महाआरोग्य शिबीराचा लाभ घेतला. शिबिराची सुरुवात गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या व तीनही मुली सिंधू गव्हाळे शोभा मोरे, लताबाई इंगळे यांच्या हस्ते कमला आईच्या  प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.

श्रद्धांजली च्या कार्यक्रमात, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, नगरसेवक मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक दीपक धांडे,उमाकांत शर्मा(नमा), एडवोकेट निर्मल दायमा, प्रा. एन  पी निळे, गावकऱ्यांच्या वतीने सरपंच किरण राजपूत, सिंग पाटील, उघडू इंगळे, नाशिकेत नेमाडे, ग्रामपंचायत सदस्य कैलास निकाळजे, आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांनी शिबिराचा समारोप करताना आईच्या आठवणींना उजाळा दिला त्यांचं मनोगत ऐकताना  डोळे पाणावले. मातोश्रीला झाड लावायची जगवायची आवड होती म्हणून गावकऱ्यांना सिताफळाच्या रोपांचे वाटप करून ते जगवण्याचा संकल्प या वेळी त्यांनी केला.

माजी पोलीस पांडू पाटील, गोकुळ निळे, मराठी शाळेचे नारखेडे, भीमराव सुरवाडे, पंडित बोदडे, उत्तम चिंधु सुरवाडे, प्रभाकर निकाळज,  गोदावरी फाउंडेशनचे सर्व तज्ञ डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. शिबिराच्या कार्यक्रमाला आणि श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content