सह्याद्री प्रतिष्ठानने उंदेरी किल्ल्यावरील तीन तोफांना दिली नवसंजिवनी

underi fort

चाळीसगाव, प्रतिनिधी | सह्याद्री प्रतिष्ठान या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या संघटनेतर्फे दि.५ जानेवारी रोजी अलिबाग जवळील उंदेरी या समुद्री किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफांना तोफ गाडे बसून पुन्हा एकदा पूर्वीसारख्या वैभवाने विराजमान केले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या आलिबाग विभागातर्फे या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

 

या तोफगाडे अर्पण सोहळ्यास वन विभागाच्या वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान सचिव सुनील लिमये व चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिजीत पानसे सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे अध्यक्ष दिलीप घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठानने यापूर्वीही याच भागातील पद्मदुर्ग या किल्ल्यावर दोन तोफांना तोफ गाडे बसवलेले असून याच पद्मदुर्ग किल्ल्यावर मागील आठवड्यात देशातील सर्वात उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तुंग, तिकोना, तोरणा, सिंहगड, सज्जनगड, कोथळीगड अशा जवळपास ११ किल्ल्यांना सागवानी दरवाजे बसवून या किल्ल्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्रातील गड किल्ले पुन्हा एकदा वैभवाने उभे रहावे, हे या प्रतिष्ठानचे उद्दिष्ट असून उंदेरी किल्ल्यावरील कार्यक्रम सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभागाचे संजय पाडेकर विलास सुर्वे यांचेसह त्यांच्या सार्‍या सहकार्‍यांनी यशस्वीतेसाठी कष्ट घेतले. सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसंवर्धन विभागाचे प्रमुख गणेश रघुवीर उपाध्यक्ष समीर म्हात्रे, संपर्कप्रमुख प्रकाश नायर, प्रकाश भोसले, अभिषेक ठाकूर, राज बलशेटवार, अशोक भोसले, अतिश मुंगसे, अमित कुलकर्णी, मानसी पाठक, संगीता जाधव, शरद पाटील, अजय जोशी, गजानन मोरे यांचेसह महाराष्ट्रभरातून शेकडो दुर्ग सेवक दुर्गप्रेमींनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती.

Protected Content