जिल्हा परिषदेच्या चारही सभापतीपदी भाजपचे उमेदवार विजयी (व्हिडीओ)

ZP news

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीची प्रक्रिया सोमवारी दि. ६ रोजी झाली. अनपेक्षित घटनेने आणि नाराजी नाट्याने ही निवड कायम स्मरणात राहणारी ठरली. नाराजी महानाट्यानंतर चारही विषय समिती सभापती भाजपचे उमेदवार विजयी झाले.

यांची झाली निवड
समाजकल्याण सभापतीपदी चांगदेव-रुईखेडा गटाचे जयपाल विरसिंग बोदडे, महिला बालकल्याण सभापतीपदी वर्डी-गोरगावले गटाच्या ज्योती राकेश पाटील, विषय क्रमांक एक सभापतीपदी साखळी-दहीगाव गटाचे रविंद्र सूर्यभान पाटील तर विषय क्रमांक दोनच्या सभापतीपदी विरवाडे-चौगाव गटाच्या उज्ज्वला प्रशांत म्हाळके यांची वर्णी लागली आहे. ३५ विरुद्ध २९ च्या फरकाने भाजपचे चारही उमेदवार विजयी झालेत.

यांनी भरला होता अर्ज
जळगाव जिल्हा परीषदेच्या विषय समिती सभापतीची निवड आज करण्यात आली. यात समाजकल्याण सभापतीपदी महिला व बालविकास सभापतीपदासाठी शिवसेनातर्फे पवन भिलाभाऊ सोनवणे, भाजपातर्फे जयपाल विरसिंग बोदडे आणि राष्ट्रीवादीतर्फे तळई उत्राण गटाचे वैशाली मंगलसिंग गायकवाड यांनी अर्ज केला होता. महिला व बालविकास सभापतीपदासाठी भाजपाच्या ज्योती राकेश पाटील आणि राष्ट्रवादीतर्फे कल्पना संजय पाटील यांनी अर्ज केला होता. विषय समिती 1 साठी मधुकर सुखदेव पाटील, अमित महेश देशमुख, सुरेखा नरेंद्र पाटील आणि रविंद्र सुर्यभान पाटील यांनी तर विषय समिती 2 साठी डॉ. निलम शशिकांत पाटील, भाजपाचे रविंद्र नाना पाटील, उज्ज्वला प्रशांत म्हाळके आणि गजेंद्र पांडूरंग सोनवणे यांनी अर्ज केला होता.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3158284200853382/

Protected Content