गवळी समाजातर्फे कुस्त्यांची भव्य दंगलीचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी शहरातील प्रजापत नगर येथे यादव गोल्ला गवळी समाजतर्फे आज रविवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी कुस्त्यांची भव्य दंगलीचे आयोजन करण्यात आले. यात कुस्त्यांच्या स्पर्धेत देशभरातील विविध जिल्ह्यांमधील १०० हून अधिक पैलवानांनी सहभाग नोंदविला होता.

भव्य कुस्ती स्पर्धेचे दत्तू पैलवान, विजू वाडकर,  दिलीप पैलवान संतोष पैलवान,  सुनील पैलवान, राजू सपकाळे छत्रपूर, आबा सोनवणे या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धाटन करण्यात आले. या कुस्ती स्पर्धेत धुळे येथील प्रवीण (लड्या) विरुध्द बुरहाणपूर यांची कुस्ती बरोबरीत झाली. तर धीरज गवळी जळगाव याने वरणगाव येथील पैलवानाला आसमान दाखवले. अनुकेत पैलवान याने सुद्धा उत्तम कुस्ती खेळली. शेवटच्या मानाच्या कुस्तीत नॅशनल चॅम्पियन नितीन गवळी याने इंदोर येथिल पैलवानाला एका मिनिटात असमान दाखवत स्पर्धेत मिळविला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अमोल सरकारी,  सुरेश गवळी,  धर्मा गवळी,  नंदू गवळी, राजू गवळी, संतोष गवळी,  बाबा गवळी, राहुल गवळी, कन्हैया गवळी , संजू गवळी,  मोहन गवळी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content