जामनेरात भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी शहरातील बाबाजी राघू मंगल कार्यालयमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये बैठक पार पडली.

यावेळी “येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पाहता सर्वांनी कामाला लागावे. त्याचबरोबर तालुक्यातील बूथ सक्षम करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करा.” असे आवाहन भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केले.

या बैठकीत व्यासपीठावर लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर माजी जि प अध्यक्ष दिलीप खोडपे, भाजपा ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, भाजपा शहराध्यक्ष अतिश झाल्टे, नगरपालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, तुकाराम निकम, नवल पाटील यांच्यासह नगरसेवक जि प सदस्य पंचायत समिती सदस्य शेतकरी संघ संचालक मार्केट कमिटी संचालक गटप्रमुख गणप्रमुख शक्ती केंद्रप्रमुख बुत प्रमुख व भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.

Protected Content