Home Cities जळगाव संघर्ष भालेरावला जळगांव जिल्हा पोलीस दल कराटे स्पर्धेत रजत पदक

संघर्ष भालेरावला जळगांव जिल्हा पोलीस दल कराटे स्पर्धेत रजत पदक

0
53

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी जिल्हा पोलीस दल व जळगांव जिल्हा वेल्फेअर फाउंडेशन जळगांव संचालित पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगांव जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली होती. यात संघर्ष भालेराव यानं रजत पदक प्राप्त केलं आहे.

यात केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचा विद्यार्थी संघर्ष योगेश भालेराव याने सात वर्षे वयोगटात आपली उत्कृष्ट कामगिरी नोंदवत  रजत पदक पटकावले. सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा साहेब तसेच डेप्युटी कमिशनर श्री. साळुंखे यांच्या हस्ते त्याला पदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील, पालक योगेश भालेराव सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले. त्याच्या यशामागे आर.जे.मार्शल अकॅडमीचे संचालक प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

 


Protected Content

Play sound