Home धर्म-समाज नंदकुमार शेलकर यांचे डिजिटल मीडियात पत्रकारिता प्रशिक्षण पूर्ण

नंदकुमार शेलकर यांचे डिजिटल मीडियात पत्रकारिता प्रशिक्षण पूर्ण

0
27

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी सध्याच्या डिजिटल मीडियाच्या युगात शिक्षण घेऊन पत्रकारिता करणे महत्वाचे आहे. पत्रकार प्रशिक्षण केंद्र अंतर्गत पाचोरा येथील पत्रकार नंदकुमार शेलकर यांनी महात्मा सेवा फाऊंडेशन, जळगाव या संस्थेअंतर्गत सुरु असलेल्या ‘डिजिटल मिडिया पत्रकारिता प्रशिक्षण मोहिमे’ अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले असून याबाबत त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पाचोरा शहरातील पत्रकार गणेश शिंदे, भिकन पाटील, शिंदाड, प्रमोद बारी तसेच जावेद शेख यांनी मे – २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन डिजिटल मीडिया जर्नलिजम, पत्रकार प्रशिक्षणामध्ये वेब मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडिया बाबत शिक्षण घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले असून याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound