महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे गुणगौरव सोहळा (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा आणि अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने गुणगौरव सोहळा व सन्मान समारंभाचे आयोजन राधाकृष्ण मंगल कार्यालयात आज रविवारी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले

सुवर्णकार समाजातील शैक्षणिक क्षेत्रात विविध प्राविण्य मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यासाठी रविवार, दि. २१ ऑगस्ट रोजी शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा व अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने गुणगौरव व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. नितीन विसपुते, डॉ. पुनम दुसाने, नगरसेविका रंजना वानखेडे, सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव, व्यावसायिक गणेश दापोरेकर, प्रकाश विसपुते, योगेश भामरे, यश विसपुते, नंदू बागुल, रमेश वाघ, मोहन हिवरकर, रामदास निकुंभ यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील सुवर्णकार समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी प्रास्ताविक अध्यक्ष संजय विसपुते यांनी प्रास्ताविक केले.  प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ. विवेक काटदरे यांनी “विद्यार्धी व विद्यार्धींनीना पुढील शिक्षण करण्याकरता आपण कसा अभ्यास करावा व अभ्यासबाबत नियोजन कसे असावे तसेच स्वयंम अध्ययन करून करून अभ्यासात वेळेचं नियोजन करून सातत्य ठेवून अभ्यास करावा,” याबाबत मर्गदर्शन केले

या कार्यक्रमात विजय वानखेडे, अरुण वडनेरे, राजेंद्र विसपुते, इच्छाराम दाभाडे, दीपक जगदाळे, शशिकांत जाधव, दीपक जाधव, गोकुळ सोनार, सुभाष सोनार, धनराज जाधव, रत्नाकर दुसाने, प्रशांत विसपुते, उत्तमराव नेरकर,भगवान दुसाने, नितीन गंगापूरकर, सुरेश सोनार, विनोद सोनार, मनोज सोनार याह इतरांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अॅड केतन सोनार, राजश्री पगार यांनी केले तर संजय पगार यांनी आभार मानले.

 

Protected Content