जिल्ह्यात नऊ पॉझिटीव्ह; बाधीतांची संख्या ४६८ वर

जळगाव प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये नऊ रूग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली असून यामुळे आता जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ४६८ इतकी झाली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांबाबतची ताजी माहिती दिली आहे. यानुसार-जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 110 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

पैकी 101 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नऊ व्यक्तीचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळचे 4, यावलचे 2 तर सावदा, एरंडोल व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे .

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 468 इतकी झाली आहे.

Protected Content