एमआयडीसीतील कंपनीत आग

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसीतील व्ही सेक्टर मधील हिरा रोटो पॉलीमर्स या कंपनीत शॉर्टसर्किटने आग लागून कंपनीतील मशीनरी व इतर साहित्य जळून ३ लाख २० हजार ४७० रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार, २६ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील सदोबा नगरात भूषण धनंजय खडके हे वास्तव्यास आहेत. त्यांची एमआयडीसी व्ही सेक्टर भागात हिरा रोटो पॉलिमर्स नावाची कंपनी आहे. या कंपनीतील १० हजार लीटरच्या इलेक्ट्रीक मशीन पॅनल मध्ये रविवार, २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत दहा हजार लिटर इलेक्ट्रीक मशीन पॅनल, एक हजार लीटर क्षमतेचा डुअल टँकर, दोन पी पी कस्टमाईज टँक, एक स्पाइलर इंट्री, प्लॅस्टीक टाकीचे १५ झाकण, प्लॅस्टीकचे डस्टबिन, ५०० लीटरची प्लास्टिकची पाण्याची टाकी, असा एकूण ३ लाख २० हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. या प्रकाराबाबत कंपनीचे मालक भूषण खडके यांनी सोमवारी एमआयडीसी पोलिसात खबर दिली. त्यावरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.

 

Protected Content