आत्महत्येस प्रवृत्त केले : संशयितांचा जामीन फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । निवडणुकीच्या वादातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातील पाच संशयितांचा जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

याबाबत वृत् असे की, चाळीसगाव हातगाव ग्रामपंचायत निवडणुकीत अनिल सुरेश नागरे (वय २४) यांच्या आई गुंताबाई सुरेश नागरे यांचा केवळ एका मताने पराभव झाला. त्या कारणावरून २० जानेवारी २०२१ रोजी गावातील शंकर पांडू सानप, अमोल शंकर सानप, विलास शंकर सानप, भय्या लालकिसन नागरे आणि बापू लालकिसान नागरे यांनी अनिल नागरे यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांशी भांडण केले. या भांडणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल केली होती. याचे वाईट वाटून अनिल नागरे यांनी शंकर सानप यांच्या शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  अनिल नागरे यांनी त्यांच्या व्हॉट्सपवर व्हाइस रेकॉर्ड करून संबंधित संशयित आरोपींचे नावे सांगत त्यांच्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते.

या गुन्ह्यातील संशयित पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन सर्वांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

 

Protected Content