वाळू वाहतूकदारांची मुजोरी; दसनूरच्या उपसरपंचाला मारहाण, शेतकऱ्यांचा मोर्चा

raver news

रावेर (प्रतिनिधी)। डंपरद्वारे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याने दसनूरच्या उपसरपंचाला केलेली मारहाण व त्याच्या मुजोरीला कंटाळलेल्या तालुक्यातील दसनूरच्या सुमारे १०० शेतकऱ्यांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयाला धडक दिली.

यावेळी त्यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त करीत कारवाई करण्याची मागणी केली. सुकी नदी पत्रातून अवैधपणे डंपरद्वारे वाळू वाहतूक करणाऱ्या ज्ञानेश्वर लोणारी (चाले), कुणाल लोणारी, शुभम लोणारी, व संगम कुटे यांनी दसनुरचे उपसरपंच सचिल गोविंदा पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या व शासनाचा महसूल बुडविणाऱ्या वाळू माफियावर कडक कायदेशीर कारवाई करण्यची मागणी दसनूरच्या  सुमारे १०० शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठत नायब तहसीलदारांकडे केली आहे. प्राणघातक हल्ला कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी यावेळी नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिले. यावेळी कृउबा समिती सभापती श्रीकांत महाजन, दसनूरचे उपसरपंच सचिन पाटील, महेश चौधरी यांच्यासह सुमारे १०० शेतकरी उपस्थित होते.

Protected Content