विरोध असेल तर ‘तो’ निर्णय बदला ! : शरद पवार

बारामती, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीका केली असतांना शरद पवार यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध होत असल्यानं निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचं काही कारण नसल्याचे वक्तव्य करून आधीच्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे.

राज्यातील किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्याने राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज आपल्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.  या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले,’वाईन आणि इतर जे काही आहे त्यात फरक जाणून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती भूमिका घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केल्यास माझा त्याला विरोध असण्याचं कारण नाही.

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या परवानगीबाबतच्या निर्णयाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्याने तो बदलल्यास त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, ’हा फार चिंताजनक विषय असल्याचं मला वाटत नाही. तरी काही घटकांना वाटत असेल तर राज्य सरकारने काही वेगळा दृष्टीकोन स्वीकारला तर त्याच्यात फारसं वावगं ठरणार नाही.’

देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईन चा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये अठरा वाईनरी आहेत. १८ वायनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेळा निर्णय घेतला, तो निर्णय मागे घेतला तरी त्याचे काही वाईट वाटायचे कारण नाही असंही शरद पवार म्हणाले.

 

 

 

 

Protected Content