मोदी सरकारची माहिती जनतेपर्यत पोहचवणार महानगर भाजप !

जळगाव प्रतिनिधी | महानगर भाजपतर्फे आजपासून बूथ विस्तार अभियान सुरू करण्यात आले असून याच्या अंतर्गत केंद्रातील मोदी सरकारच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात १ ते १५ ऑगस्ट दरम्यान बूथ विस्तार अभियान राबविण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

या बैठकीत बूथ विस्तार अभियानाचे नियोजन करण्यात आले. प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे यांनी केले. आमदार सुरेश भोळे यांनी महानगरातील ३६५ बुथमध्ये अभियान राबवण्यात येणार आहे. अभियानांतर्गत कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षांतील केलेल्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन करण्यात आले. या बैठकीला भाजपचे जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, डॉ राधेश्याम चौधरी, सचिन पानपाटील, प्रदीप रोटे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, विठ्ठल पाटील, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, अक्षय चौधरी, धीरज वर्मा, मंडल अध्यक्ष रमेश जोगी, परेश जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content