बापरे….! : विद्यालयातच प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

भडगाव संजय पवार | तालुक्यातील वाडे येथील विद्यालयात रात्री एका प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वाडे येथील माध्यमिक विद्यालयात रात्री एक तरूण आणि तरूणीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे प्रेमी युगल असून आपल्या विवाहाला समाज मान्यता मिळणार नाही याच्या भितीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. माध्यमिक विद्यालयातील पहिल्या मजल्यावर जिन्यावर जाऊन गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा भयंकर प्रकार उघड झाला.

याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांसह भडगाव पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा यातील तरूण हा मुकेश कैलास सोनवणे (वय २२, रा. वाडे, ता. भडगाव) आणि तरूणी ही नेहा बापू ठाकरे (वय १९, रा. वाडे) असल्याचे समजले. हे दोन्ही एकाच समाजाचे असल्याचे वृत्त आहे. या दोन्ही जणांचे मृतदेह खाली उतरवून त्यांच्या पार्थिवाला शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

तर, या प्रकरणी पोलीस पाटील अरविंद फकीरा पाटील यांच्या खबरीवरून मयत मुकेश कैलास सोनवणे (वय २२) नेहा बापू ठाकरे वय १९ यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पीएसआय सुशील सोनवणे हे करीत आहेत.

Protected Content