Home Cities यावल आ. चौधरींचा यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार

आ. चौधरींचा यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार

0
35

 

यावल,  प्रतिनिधी । रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.

यावल येथील खरेदी विक्री सहकारी संघात आयोजीत शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी कॉंग्रेस कमेटीच्या कार्यकारणीचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हे यावल येथे आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश पोपटराव येवले, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेस अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष सुकदेव नाना बोदडे , विक्की पाटील ,सामाजीक कार्यकर्ते धिरज कुरकुरे, अल्ताफ तडवी , अरूण लोखंडे आदी कार्यकर्ते या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound