नांदेड  वृत्तसंस्था । पंजाब गुन्हे अन्वेषण शाखा आणि महाराष्ट्रातील पोलिसांच्या संयुक्त कारवाईत खलिस्तानी चळवळीच्या अतिरेक्याला  नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये पंजाब पोलिसांना तो हवा होता.

 

सरबजीत कीरत असं या खलिस्तान समर्थकाचं नाव आहे. पंजाब सीआयडीनं याचं लोकेशन शोधून काढलं आणि याची माहिती नांदेड पोलिसांना दिली, या माहितीच्या आधारे नांदेड पोलिसांनी कीरतला ७ फेब्रुवारी रोजी अटक केली. अटकेनंतर आता कीरतला पंजाबकडे नेण्यात येत आहे. प्रक्षोभक भाषणं आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे त्याच्यावर आरोप आहेत.

 

 

लखनऊ येथून सोमवारी यूपी पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहिमेद्वारे एका खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला अटक केली. जगदेव सिंग ऊर्फ जग्गा असं त्याचं नाव असून तो पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. जग्गा हा अनेक खलिस्तान समर्थक कारवायांमध्ये सामील होता.

 

जग्गा हा खलिस्तान समर्थक दहशतवादी परमजीत सिंग पम्मा आणि मलतानी सिंग यांचा निकटवर्तीय आहे. परमजीत सध्या युकेमध्ये आहे तर मलतानी हा जर्मनीत वास्तव्याला आहे. पंजाबमध्ये राष्ट्रविरोधी कारवाया केल्याप्रकरणी दोघांवरही गुन्हे दाखल आहेत. दहशतवादाला प्रोत्साहन देणे आणि धार्मिक पेचप्रसंग निर्माण करण्याचा त्यानं प्रयत्न केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

 

ट्रान्झिट रिमांडनंतर जग्गाला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परमजीत आणि मलतानी यांनी जग्गाला देशविरोधी कारवायांसाठी तयार केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या दोघांनी जग्गा आणि त्याचा सहकारी जगरुप सिंग याला मध्य प्रदेशातून शस्त्र विकत घेण्यासाठी पैसाही पुरवला आहे. दरम्यान, जगरुपला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.

 

Protected Content