जुन्या भांडणाच्या वादातून एकाचे डोके फोडले

जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी तरूणाला बेदम मारहाण करून लाकडी दांडूक्याने मारहाण करून डोके फोडल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शाहु नगर परीसरात घडली. जखमी तरूणास जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात असून तिघांविरोधात शहर पोलीसा तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, अनिफ नईम खान उर्फ हिरो (वय-३२) रा. एस.टी.मोहल्ला, शाहू नगर हा नारळ पाणी विक्री गणेश कॉलनीत दुकान आहे. जुन्या भांडणाच्या वादात मध्यस्थी केल्याचा संशयाने जुबेर हमीद खाटीक (वय-३२), शोएब फारूख खाटील (वय-२०) आणि नचरू अजिज भिस्ती (वय-३३) सर्व रा. शाहु नगर यांनी बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास येवून शिवीगाळ, मारहाण केली. यात संशयित आरोपी जुबेर खाटीक याने लाकडी दांडूका अनिफच्या डोक्यात टाकल्याने गंभीर दुखापत केली. यात अनिफ गंभीर दुखापत झाली असून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज सकाळी शहर पोलीसात जुबेर हमीद खाटीक, शोएब फारूख खाटील आणि नचरू अजिज भिस्ती यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content