कारण नसतांना तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाम नगर येथे तरुणाला दोन जणांनी मारहाण करत त्याच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारुन दुखापत केल्याची घटना मंगळवार, २ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील खोटेनगर येथे प्रमोद मधुकर सैंदाणे वय ३४ हा तरुण राहतो. मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रमोद हा गिरण पंपींग ते वाघनगर दरम्यान शामनगर येथे असतांना याठिकाणी त्याला अजय कोळी व सोनू कोळी या दोन जणांनी शिवीगाळ करत दमदाटी करुन मारहाण केली, यादरम्यान दोघांनी प्रमोद यांच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारुन दुखापत केली. या घटनेत प्रमोद हा जखमी असून त्याच्या तक्रारीवरुन अजय कोळी व सोनू कोळी या दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक हे करीत आहेत.

Protected Content