पाचोऱ्यात उद्या शिक्षक दिनानिमित्त खुली निबंध स्पर्धा

पाचोरा प्रतिनिधी । उद्या ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त पाचोरा शिवसेना युवसेनातर्फे खुली निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

या खुल्या निंबध स्पर्धेचा  “माझे शिक्षक” हा विषय आहे. या स्पर्धेत विजेत्यास प्रथम पारितोषिक म्हणून ५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये,  तृतीय पारितोषिक २ हजार रुपये तर  उतेजनार्थ प्रत्येकी ५०० रुपये  (१० उत्तेजनार्थ पारितोषिके) तसेच सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  स्पर्धेत समाविष्ट स्पर्धकांनी निबंध हा स्वतः च्या अक्षरात लिहून बंद लिफाफ्यात स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, व पत्ता नमूद करुन दि. ११ सप्टेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजे पर्यंत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील “शिवतीर्थ” शिवसेना कार्यालय, पाचोरा  येथे जमा करावे. असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!