लॉकडाऊन : नागरिकांना बेकायदेशीररित्या उत्तर प्रदेशला घेऊन जाणारा ट्रक पकडला

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात संचारबंदी आणि सर्व सिमा बंद असतांना पुण्याहून उत्तरप्रदेशात घेवून जाणाऱ्या ट्रकवर कारवाई करत चालकासह ९६ जणांना एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले. सर्वांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आले असून त्यांना राधाकृष्ण मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीचे आदेश काढल्यानंतर जिल्ह्यातील सर्व सिमा तत्काळ बंद करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही प्रवेश करण्यासाठी मनाई करण्यात आले आहे. असे असतांना पुण्याहून उत्तरप्रदेश येथे ९६ जणांना घेवून जाणारा ट्रक सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दाखल झाल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी सपोनि संदीप हजारे, पो.कॉ. हेमंद कळसकर, पो.कॉ. योगेश बारी यांना अजिंठा चौफुलीर ट्रक क्रमांक (एमएच ०४ डीके ०४१९) वरील चालक अब्दुल रेहमान रमजान अली चौधरी (वय-४०) रा. पद्मानगर, पोलीस चौकी, भिवंडी ठाणे यांची चौकशी केली असता ९६ जणांना उत्तरप्रदेश येथे घेवून जात असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांना सर्वांना तातडीने खाली उतरवून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात वैद्यकिय तपासणी करून सर्वांना शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

Protected Content