भुसावळातील क्वारंटाईन सेंटर रामभरोसे ; सुविधांचा अभाव !

भुसावळ, संतोष शेलोडे | येथील कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्यांना व त्यांच्या संपर्कात व परिवारातील संशयित तसेच कोरोना रुग्ण असलेल्या भागातील जिल्ह्या बाहेरील संशयितांना रुग्णांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहात ठेवण्यात आलेले आहे. या रुग्णांचा उपचार करण्यासाठी सुविधांचा अभाव असल्याने भुसावळातील क्वारंटाईन सेंटर रामभरोसे सुरू असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४० वर पोहचली आहे. ८ जणांचा मृत्यू झालेला आहे. भुसावळात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या पाश्वभूमीवर प्रशासनाने चार दिवसांसाठी जनता कर्फ्युचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना बाधित रुग्णांना आता प्रशासनाने भुसावळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहात ठेवण्यात आले आहे. यामध्ये क्वारंटाईन रुग्ण ९४ आहे. तर कोरोना बाधित (पॉझेटिव्ह) १६ रुग्ण उपचार घेत आहे. १४ मे रोजी जळगावचे उपजिल्ह्याधिकारी यांनी भुसावळातील प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने व तहसीलदार दिपक धिवरे यांच्या सोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहाला भेट दिली व पाहणी केली. रुग्णांवर उपचार कशा पद्धतीने सुरू आहे. उपचार दरम्यान डॉक्टरांना काही अडीअडचणी येत आहे का याची माहिती जाणून घेतली.

सध्या भुसावळ शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वस्तीगृहामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा बीएएमएस डॉक्टर व मलेरिया विभागाचे फिरस्ती करणारे एक कर्मचारी असे मिळून उपचार करीत आहे. चार दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली होती. व आजरोजी जळगाव जिल्ह्याचे उपजिल्ह्याधिकारी यांनी भेट दिली असता प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने मृत व्यक्तींच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. प्रशासनाने लवकरात -लवकर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी याप्रसंगी करण्यात आल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली.

Protected Content