फार्म हाऊस येथून लोखंडी अँगलची चोरी; वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा गावाजवळील फार्म हाऊस येथे अज्ञात चोरट्यांनी ८ हजार रुपये किमतीचे लोखंडी अँगल चोरून नेल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी पहाटे ५  वाजता समोर आले. या संदर्भात शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा गावाजवळ वरूण फार्म हाऊस आहे. या ठिकाणी फार्म हाऊसचे मालक दीपक दिनकर भालेराव रा. वेल्हाळा ता. भुसावळ यांनी लोखंडी अँगल ठेवले होते. दरम्यान २६ ऑगस्ट रात्री ११ ते २७ ऑगस्ट पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात यांनी ८ हजार रुपये किमतीचे लोखंडी अँगल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता पंडित भालेराव यांनी वरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ मनोहर पाटील करीत आहे.

Protected Content