कुऱ्हे पानाचे गावातून चारचाकी वाहनाची चोरी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावाजवळील गुरुकृपा पेट्रोल पंपाजवळून एकाची चारचाकी वाहन चोरून नेल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुमारास उघडकीला आली आहे. यासंदर्भात दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात माहिती अशी की, सोपान गजमल महाजन (वय 46, रा. कुऱ्हे पानाचे, भुसावळ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून चारचाकी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतात. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी त्यांची चारचाकी पिकप वाहन क्रमांक (एमएच १९ बीएम ४८४८) ही गावातील गुरुकृपा सेंटर पंपाजवळील मोकळ्या जागेवर पार्किंग म्हणून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही चारचाकी वाहन चोरून नेल्याचे शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८  वाजता समोर आली. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतु वाहनाबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. अखेर दुपारी २ वाजता सोपान महाजन यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहे.

Protected Content