लग्नाला नकार दिल्याने तरुणीवर कटरने वार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कान्हाळा ते खेडी रोडवरील एका शेताजवळ तरुणीला लग्न करण्यासाठी दबाव टाकत कटरने वार करून हातावर व छातीवर वार करून केल्याची घटना शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ८ वाजता एकावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील हनुमान नगरात २१ वर्षीय तरुणीही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता  तरुणी ही हंसराज चव्हाण उर्फ पिंटू (रा. दीनदयाल नगर भुसावळ) याच्या रिक्षात बसून कन्हाळा ते खेडीरोड दरम्यान असलेल्या एका शेताजवळ जात असताना अचानक हंसराज चव्हाण यांनी रिक्षा थांबवली व तरुणीला खाली उतरवून ‘ तू माझ्याशी लग्न कर’ असं म्हणाला. त्यावर तरुणीने नकार देत “तू नेहमी मारहाण व शिवीगाळ करत असल्याने मला तुझ्याशी लग्न करायचे नाही” असे बोलले. याचा राग घेऊन त्याने खिशातील कटर काढून तरुणीच्या हातावर आणि छातीवर वार करून गंभीर जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी हंसराज चव्हाण उर्फ पिंटू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बडगे करीत आहे.

Protected Content