Home क्राईम आयटीआय मध्ये शिकणारा मुलगा बेपत्ता !

आयटीआय मध्ये शिकणारा मुलगा बेपत्ता !

0
68


चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील आयटीआयमध्ये द्वितीय वर्षाला शिकत असलेला मुलगा बेपत्ता झाल्याचे प्रकार आज उघडकीस आले असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, याबाबत वृत्त असे की, हितेश सुनिल पाटील ( वय-२० रा. जुवार्डी ता. भडगाव) हा भिमराव खलाणे आय.टी.आय चाळीसगाव येथे द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. तो दररोज आपल्या गावाहून जुवार्डी येथून प्रवास करत होता. मात्र २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घरी जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने तो भिमराव बारकू महाले ( वय- ६१ रा. शास्त्रीनगर, भतवाल टाकी जवळ चाळीसगाव) येथे मुक्काम राहिला. यानंतर २९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता हितेश पाटील हा कॉलेजला जातो म्हणून घरून निघून गेला. मात्र तो त्या दिवशी घरी न परतल्याने वडिलांनी भिमराव महाले यांना फोन केला असता. तो सकाळीच कॉलेजसाठी निघून गेला. असे सांगितल्यावर त्याची शोधाशोध सुरु केली. मात्र तो आढळून आला नाही.

त्यामुळे भिमराव महाले यांच्या सांगण्यावरून शहर पोलिस ठाण्यात आज फिर्याद दाखल करण्यात आली. हितेश सुनिल पाटील याचा रंग सावळा असून उंची ५ फुट आहे. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound