आत्महत्या केलेल्या अपंग तरूणाचे अंत्यविधी करण्याआधीच पोलिसांनी थांबवले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील शहरातील रेणुकादेवी मंदीर परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय अपंग तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली असुन पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रेणुकादेवी मंदीर जवळच्या परिसरात राहणारा बाळू लक्ष्मण वाणी (वय ४५) अपंग तरूणाने २५ मार्च सोमवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान गळफास घेत आत्महत्या केलेल्या अपंग तरुणाबाबत माहिती न देता त्याच्या मृतदेहाचा अंत्यविधी होण्याआधीच पोलीसांनी स्मशानभुमी जावुन तरुणाचा अंत्यविधी थांबविला व प्रेतास यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. याबाबत निलेश नारायण वाणी यांनी यावल पोलिस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे व पोलीस तपास करीत आहे.

यावलच्या ग्रामीण रूग्णालयात मयत बाळु वाणी याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या अपंग तरुण बाळु वाणी हा आपल्या ८५ वर्षाच्या वयोवृद्ध आई सोबत रेणुकादेवी मंदीर परिसरात राहात होता. त्याने अचानक उचलेल्या आत्महत्याच्या निर्णयामुळे शहरात व परिसरात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे. वयोवृद्ध आईच्या अपंग मुलाच्या आत्महत्याच्या कारणाचे शोध पोलीसांनी घ्यावा असे बोलले जात आहे.

Protected Content