बिलाल चौकातील ‘बवाली’ दोन वर्षासाठी हद्दपार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बिलाल चौकात राहणाऱ्या गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यांच्यावर वेगवेगळे पाच प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. बुधवारी १८ जानेवारी रोजी सकाळी १० प्रांताधिकारी महेश सुधाकर यांनी आदेश काढले आहे.

शेख जुनेद उर्फ बवाली शेख युनूस (वय-२६) रा. नवीन तांबापूरा, बिलाल चौक, जळगाव असे हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शेख जुनेद याच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलीसांनी तयार करून उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले होते. या गुन्हेगारावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच तांबापूर परिसरातील दहशत माजवून परिसरातील वातावरण गढूळ करण्याचे काम करत होता. प्रांत महेश सुधाळकर यांनी एमआयडीसी पोलीसांनी पाठविलेला हद्दपारीचा प्रस्तावाच गंभीर दखल घेत गुन्हेगार शेख जुनेद उर्फ बवाली याला जळगाव जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार केले आहे. हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउनि आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. योगेश बारी, सचिन पाटील, यांनी कारवाई शेख जुनेद याला जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

 

Protected Content