‘मसाका’ परिसरात अजगराला जीवदान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात अजगराला सर्पमित्रांच्या मदतीने जीवदान देण्यात आले.

या संदर्भातील सविस्तर वृत असे की दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या आवारात मोठ्या प्रजातीचा अजगर दिसुन आला. या अजगराला पाहताच ईगल एमपॉवर सेक्युरिटी या खाजगी कंपनीचे कर्मचारी दिपक कोळी व अतुल सपकाळे यांनी त्यांचे सुपरवाईजर सुलतान पिंजारी यांना कळविले. दरम्यान, त्यांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला. यात त्या अजगराला उमेश सपकाळे व दिपक कोळी व सुलतान पिंजारी या सर्पमित्रांनी त्या अजगराला सुखरूप पकडून त्या अजगराचे प्राण वाचवले.

या अजगराने रस्ता ओलांडला असता तर येणार्‍या जाणार्‍या वाहनाने त्याची जीवित हानी झाली असती. या अनुषंगाने सिक्युरिटी गार्ड व सुपरवायजर सुलतान पिंजारी यांनी पूर्व विभाग वन विभाग क्षेत्र अधिकार्‍यांना फोन द्वारे माहिती तात्काळ दिली. या अनुषंगाने त्या ठिकाणी तात्काळ वन विभागाचे कर्मचारी येऊन सुलतान पिंजारी, दीपक कोळी व उमेश सपकाळे यांनी या अजगराला वन विभागा कर्मचार्‍यांना पकडून दिले. यातून त्यांना मोठा अजगर त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

परिसरामध्ये अजगर आढळल्याने एकच झुंबड उडालेली होती यावल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वनरक्षक तुकाराम लवटे, आगार रक्षक भैय्यासाहेब गायकवाड गोवर्धन डोंगरे, किष्णा शेळके आदी कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: