शिक्षकाचा समाजसेवी उपक्रम : टँकर, शीत शवपेटीचे लोकार्पण

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील रहिवासी तथा हिंगोणा शाळेचे उपक्रमशिल शिक्षक सिद्धेश्वर वाघुळदे यांनी फैजपूर शहरवासीयांना शवपेटी व पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले. हा सोहळा काल सायंकाळी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

 

ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून देण्यात येणाऱ्या ज्ञानदानाला अन्नदानापेक्षा महत्त्व आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. आई-वडिलांचे ऐकून होते. आईवडीलांच्या आज्ञेत राहिल्याने गणपती देवता आपली मनोकामना पुर्ण करेल असे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी गावासाठी लोकोपयोगी साधनांच्या उद्घाटनप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक प्रा. व. पू. होले, महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, राममनोहरदास महाराज, माजी नगराध्यक्ष बी. के. चौधरी, पी. के. चौधरी, नरेंद्र नारखेडे, भरत महाजन, माजी नगराध्यक्षा आशालता चौधरी, रवी होले, माजी नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, भाजप शहराध्यक्ष अनंता नेहेते, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, कामगार नेते किरण चौधरी, विष्णू नेमाडे, बंडू सरोदे, नरेंद्र चौधरी, राजू महाजन, प्रा. उमाकांत पाटील व भाविक उपस्थित होते.

 

Protected Content