मोफत शस्त्रक्रिया महाशिबिरात ४५० रुग्णांवर उपचार सुरु

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हर्निया, हायड्रोसिल, अपेंडीक्स, गर्भपिशवी, डायबेटिक फूट, व्हेरीकोज व्हेन्स, थायरॉईड इत्यादी आजारांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सुरु असलेल्या महाशस्त्रक्रिया शिबिरांमध्ये मोफत निदान व शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. सद्यस्थीतीला तब्बल ४५० रुग्णांवर उपचार सुरु असून ७०० हून अधिक रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिराचा सोमवार १३ फेब्रुवारी हा अखेरचा दिवस आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ११ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिर आयोजित केले होते. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने रुग्णांनी महाशिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होवून आरोग्याची तपासणी करुन घेतली. यावेळी रुग्णांची रक्‍त, लघवी चाचणी, ईसीजी कार्डिओग्राफ, टू डी इको तपासणी, स्ट्रेस टेस्ट यासह पोटाची सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय तपासणीही मोफत करण्यात आली. या मोफत महाशिबिरामुळे शेकडो रुग्णांच्या आजाराचे तात्काळ निदान झाले असून ४५० रुग्णांवर रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये उपचारही सुरु झाले आहे. तज्ञ डॉक्टरांची टिम दिवस-रात्र रुग्णांवर येथे उपचार करीत असून नर्सिंग स्टाफ देखील रुग्णांची सेवा-सुश्रृषा करत आहे. उपचारार्थ दाखल झालेल्या रुग्णांना भोजनही येथे मोफत देण्यात आले असून औषधोपचार देखील विनामूल्य स्वरुपात सुरु आहे. जळगाव जिल्ह्यासोबतच विदर्भवासियांना या महाशिबिराचा लाभ होत असून ७०० हून अधिक रुग्णांची उपचारासाठी नावनोंदणी झाली. सोमवार, दि.१३ फेब्रुवारी संपूर्ण आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिराचा अखेरचा दिवस आहे. ज्या रुग्णांना मुळव्याध, प्रोस्टेट, हायड्रोसिल, व्हेरीकोज व्हेन्स, मुतखड्यासह नाकाचे वाढलेले हाड, नासूर, मोतिबिंदू, गर्भपिशवीचे विकार, गुडघेदुखी, मणका विकार असेल त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी आशिष भिरुड ९३७३३५०००९, रत्नशेखर जैन ७०३०५७११११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

हृदयालयात २०० रुग्णांची तपासणी
श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून हृदयविकारी रुग्णांसाठी हृदयालयातर्फे मोफत हृदयतपासणी शिबिर घेण्यात आले असून २०० रुग्णांची तपासणी सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील यांनी केली. शनिवार ११ व रविवार १२ या दोन दिवसात तब्बल २०० रुग्णांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली. मोफत टू डी इको तपासणीमुळे ८० रुग्णांमध्ये हृदयविकाराचे लक्षणे आढळली असून त्यांची एन्जीओग्राफी केली जात आहे. आतापर्यंत ३८ रुग्णांना एन्जोप्लास्टीची गरज असल्याचे निदान डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी केले असून एन्जीओप्लास्टीही केली जात आहे.

Protected Content