स्टेअरिंग लॉक झाल्याने ट्रक उलटला; खोटे नगर येथील घटना

जळगाव प्रतिनिधी । नवापूरकडे जाणाऱ्या ट्रकचे स्टेअरींग लॉक झाल्याने पलटी होवून चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना खोटेनगर जवळी राष्ट्रीय महामार्गावर घडली.

सविस्तर माहिती अशी की, नागपूर येथील ट्रक (एमएच-०६ एसी ८९५५) वरील चालक विकास धल (रा. ओडीसा) हा कापडांचे धागे घेवून भरधाव नवापूरच्या दिशेने जात होता. गुरूवारी ३ जून रोजी ८.३० वाजता जळगाव शहरातील खोटे नगरातून जात असतांना ट्रकचे स्टेअरींग अचानक लॉक झाले. लॉक होताच ट्रक स्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यात चालक विकास धल हा गंभीर जखमी झाला. याच ट्रकच्या मागे त्याच कंपनीचा ट्रक चालत होता. त्यातील चालकाने व नागरिकांनी लागलीच जखमी चालक विकास यास उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, या अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याप्रकरणी अद्याप पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आलेली नव्हती.

Protected Content