सुप्रीम कॉलनी उधारीच्या पैशांवरून तरुणाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी येथे उधारीचे पैशांच्या कारणावरून तरुणाला चार जणांनी पकडून दगडाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार 3 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सुप्रीम कॉलनीत पोलीस कॉलनीत सलमान सलीम खाटीक वय 27 हा राहतो. तो रीक्षा चालक आहे. सोमवारी रात्री आठ वाजता समाधान हा पोलीस कॉलनी येथील रिक्षा स्टॉप येथे असताना उधारीच्या पैशांच्या कारणावरून रईस शेख याने फोन करून बोलावून रिहान पटेल, सकलेन शेख, तौसिफ शेख या तिघांनी सलमान यास शिवीगाळ करत दमदाटी केली, यानंतर त्याला पकडुन ठेवत साहिल याने सलमान याच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली. या घटनेत सलमान हा जखमी झाला असून त्याने दिलेल्या तक्रारीवरून साहिल खाटीक, रिहान पटेल , सकलेन शेख व तौसिफ शेख सर्व रा. पोलीस कॉलनी , सुप्रीम कॉलनी जळगाव या चार जनाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content